कोपरगाव नगरपालिकेच्या कारभारावरून आपल्या समोर अनेक गैरव्यवहाराचे प्रकरणे समोर आली:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी विजय कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम उकळली. तर माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आणि निखाडे यांनी वेगवेगळ्या ठेकेदाराकडून दमदाटी करून तर कधी बिले काढून देण्याच्या बदल्यात लाखो रुपये वसूल केल्याचा आरोप विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला .
वहाडणे आपल्या आरोपात पुढे म्हणाले कि कोपरगाव नगरपालिकेच्या कारभारावरून आपल्या समोर अनेक गैरव्यवहाराचे प्रकरणे समोर आली . आपण याची वाच्यताही केली मात्र समोरच्यांची बदनामी होऊ नये म्हणून नावे घेत नव्हतो . मात्र कोल्हे गटाचे आजी माजी नगरसेवक , उपनगराध्यक्ष यांनी नावे घेऊन आरोप करण्याची मागणी वेळोवेळी केली . म्हणून आज त्यांच्या मागणी नुसारच आपण त्यांचे नावे घेऊन पुराव्यानिशी आरोप करीत आहोत . वहाडणे यांनी आपल्या आरोपांमध्ये भाजप , कोल्हे गट तसेच शिवसेनेच्या अनेक नगर सेवक , पदाधिकाऱ्यांच्या गैरकृत्याची जंत्रीच पत्रकार परिषदेत मांडली. सर्व्हे क्र २१० च्या आरक्षण उठवण्यावरुन नगरसेवक कैलास जाधव यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले . मात्र २०११ साली कोल्हे गटाचे बबलू वाणी यांच्या २.५ एकर क्षेत्रावरील आरक्षण काढताना हे झोपले होते काय? हेच कैलास जाधव त्यांचे साईबाबा नाक्यावरील सर्व्हिस स्टेशनचे अतिक्रमण काढू नये म्हणून माझ्याकडे येऊन माझे अतिक्रमण काढू नये म्हणून विंनती करीत होते. तर यांचेच सहकारी असलेले उपनगराध्यक्ष निखाडे मात्र खाजगीत येऊन जाधव यांचे अतिक्रमण काढण्याचा आग्रह धरतात . हे विद्यमान उपनगरध्यक्ष निखाडे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या सोबतीने ठेकेदारांकडून हप्ते वसुली करतात . वाजे यांनी शुभम भावसार या ठेकेदाराच्या नावाखाली १० लाखाच्या गटारीचे कामाचा ठेका स्वतः घेतला. त्याचे बिल अडकले असता . खाजगीत येऊन माझ्याकडे बिल अदा करण्याची विनंती केली आणि आपणही काम पूर्ण झाल्याची खात्री करून रक्कम अदा केली . आणि तेच आता उलट्या बोंबा मारत फिरत आहे.
अशाच प्रकारे दुसरे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी ८४ लाखाच्या गटारीचे काम त्यांचे सहकारी गोसावी याना मिळावे म्ह्णून विनंती केली होती . मात्र टेंडर मध्ये हा ठेका न मिळाल्याने आता ते उर्वरित विकासकामांना विरोध करीत आहे. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचे सहकारी पप्पू पाडियार यांच्या कायमच्या मागणीला कंटाळून सातभाई यांच्या जवळील अनेक ठेकेदार मित्र त्यांना सोडून गेले. विकास कामे नामंजूर केल्यामुळे कोल्हे गटाचेच असलेले नगर सेवक शिवाजी खांडेकर यांनी आपल्या दालनात येऊन त्यांच्याच गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिव्या घातल्या . त्यांची नाराजी काढण्यासाठीच मग त्यांना आरोग्य समितीचे सभापती करण्यात आले. आपण पोलखोल केल्यामुळे कोल्हे गट माझ्यावर खोटे आरोप करून पलटवार करतील याची मला खात्री आहे . म्हणून आता केलेले आरोप केवळ हिमनगाचे टोक आहे . आपण पुढील ८ -१० दिवसात पत्रकार परिषद घेऊन आणखीन नावानिशी पोलखोलिचा दुसरा अंक सादर करणार आहोत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *