कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस तर्फे पंतप्रधान यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन:-तुषार पोटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस तथा महिला काँग्रेस च्या वतीने राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव सौ.सायली दीपक पालखेडकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ऍड.शीतलताई देशमुख,शहराध्यक्ष सुनील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निषेध निवेदन देण्यात आले.
यावेळी सायलीताई पालखेडकर यांनी आपले विचार मांडले कि,
आज देशाचे पंतप्रधान जर बोलण्याच्या ओघात ” बेटी बचाओ बेटी पटाओ ” म्हणत असतील तर. यायतुनच भाजपा ची मानसिकता दिसून येते .देशभरात घडणाऱ्या अनेक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.उदाहरण द्यायच तर.उत्तर प्रदेश्यातील उन्नाव,मिर्झापूर, सतना मध्यप्रदेशातील पन्ना, पश्चिम बंगाल मध्ये बिरभूम, अश्या अनेक प्रकारणांमध्ये भाजपचे नेते आणि कारकर्ते सहभागी आहेत. आता तर खुद्द देशाचे पंतप्रधान बेटी पटाव म्हणतायेत. मुंबई भाजपचे एक आमदार मुलींना पळऊन आनण्याचा सल्ला देतायेत.मी देशातील माता भगिनींना आव्हान करते ज्यांना आपला आदर नाही अश्या पक्ष नेतृतवाला आणि पक्ष्याला आपल्या देश्यातून राज्यातून हद्दपार करायची वेळ आली आहे.”लडकी हू लड सकती हू”.यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव जाधव,शब्बीरभाई शेख,सुनीता ताई मुंतोडे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सोशल डिस्टंसिंग पाळून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *