बिपीन रावत व इतरांना संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये वाहिली श्रद्धांजली…
कोपरगांव प्रतिनिधी:- भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने आपण एक सच्चा देश भक्त गमविला आहे. यात त्यांच्या पत्नी मधुलिका व अन्य सैनिकी अधिकाऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला. रावत व इतरांच्या अपघाती निधनाने भारताची खुप मोठी हानी झाली आहे. जे देशाच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान करायला मागे पुढे पाहत नाही, त्यांच्यावरच नियतीने घाला घातला आहे, सर्वांच्याच आत्म्यास परमेश्वर चीर शांती देवो, अशा शब्दात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी रावत व इतरांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली.
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या अमर जवान स्मारकाजवळ संस्थेच्या वतीने रावत व इतरांना रायफलच्या मदतीने शोकशस्त्र वापरून भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डाॅ. जी.बी. गायकवाड, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की प्रत्येक भारतीयाला रावत यांच्याबाबत नितांत अभिमान आहे. संजीवनी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले आयडाॅल म्हणुन रावत यांची कारकिर्द अभ्यासावी. देदेशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी व सैनिकाचे देशप्रेम हे आपल्यातील अंगार फुलविणारा असतो. हेलिाॅप्टर दुर्घटनेत सर्व अधिकाऱ्यांचे निधन वेदनादायी असुन त्यांच्या सर्व कुटंबियांच्या दुःखात संजीवनी परीवार सहभागी आहे. याच अपघातात जखमी झालेले व उपचार घेत असलेले ग्रुप कॅप्टन वरूण सिंग यांना उत्तम आरोग्य मिळो, अशी प्रार्थणाही श्री कोल्हे यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन उपप्राचार्य कैलास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली संजीवनी मध्ये कार्यरत असलेले माजी सैनिक विजय भास्कर, विकास मुळेकर, निवृत्ती मुरडणर व शालीग्राम खिलारे यांनी यांनी केले. संतोष सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन करून आभार माणले.

फोटो ओळीः संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये बिपीन रावत व इतरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी श्री सुमित कोल्हे यांनी रावत यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केले.
