ध्येय निश्चित करून यशस्वी व्हा:- श्री संजय धिवरे…

कोपरगाव

     संजीवनी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या शैक्षणिक वर्ष  २०२०-२१  मध्ये ५५२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या...

कोपरगांव प्रतिनिधी:-
‘संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व एमबीएच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातुन ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्याची बाब भुषणावह असुन पुढील काळात रोजचे, आठवड्याचे , पंधरा दिवसांचे, महिन्याचे, सहा महिन्याचे, वर्षाचे , दिर्घ कालीन, असे ध्येय निश्चित करून जीवनात यशस्वी व्हा ’, असा सल्ला नाशिक येथिल इनकम टॅक्स विभागाचे जाॅईंट कमिशनर व संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे माजी विद्यार्थी श्री संजय धिवरे यांनी दिला.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधिल संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व एमबीच्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातुन ५५२ विध्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यात आल्या. या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या आई-वडीलांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणुन श्री धिवरे बोलत होते. या संस्मरणिय गौरव सोहळ्यााचे अध्यक्षस्थान उद्योजक व प्रगतशिल शेतकरी श्री सुरेश कोल्हे यांनी भुषविले. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, चिफ टेक्निकल ऑफीसर श्री विजय नायडू, इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल तिडके उपस्थित होते. विविध कंपन्यांमध्ये निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकाल्यानंतर अनेक माता आणि वडिलांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रुंनी पाणवल्या होत्या. पालकांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास संजीवनीने सार्थ ठरविला, असा कृतज्ञता पुर्वक भावही अनेक पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. निवड झालेल्या काही विध्यार्थ्यांना सर्वात जास्त रू ११ लााखांचे तर सरासरी ३. ५९9 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले.
या प्रसंगी श्री धिवरे यांनी पुढे म्हणाले की मीही माझे ध्येय २१ वर्षांपूर्वी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये तृतिय वर्षात शिकत असतानाच निश्चित केले. सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन वाटचाल केल्यास आपल्या जीवन प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांनाही माघार घ्यावी लागते. स्वप्न पहायला शिका, आणि ती प्रत्यक्ष आमलात आणण्यासाठी फळांची अपेक्षा न करता कर्तव्य करीत रहा, तुमची स्वप्ने निश्चित सत्यात उतरतील. माजी मंत्री व संजीवनी शैक्षणिक संस्थेचे संस्थापक श्री शंकरराव कोल्हे यांनी सुमारे चार दशकांपुर्वी पाहीलेले स्वप्न मागील अनेक वर्षांपासून सत्यात उतरत आहे व ग्रामिण भागातील विद्यार्थी कोणी नोकरदार तर कोणी उद्योजक बनत आहे, यामुळे ग्रामिण अर्थ कारणालाही चालना मिळत आहे. तसेच ज्यांना युपीएससी व एमपीएससीच्या परीक्षांसाठी तयारी करायची त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारीही श्री धिवरे यांनी दाखविली.
श्री अमित कोल्हे प्रसंगी म्हणाले की आत्ता पर्यंत सर्व निवड झालेले विद्यार्थी संजीवनीचा प्राद्यापक वर्ग आणि आई-वडील यांच्या छत्रछायेखाली सुरक्षित होता, परंतु या सर्वांनी आता स्पर्धात्मक जगात प्रवेश केला आहे. कंपन्या विविध कसोट्यांमधून तुमच्यातील क्षमतांची चाचपणी करतील. कदाचित नोकरीच्या ठिकाणी मनासारखे जेवण मिळणार नाही, परंतु तडजोड करायला शिका , माघारी परत न फिरता आपापल्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करा. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजला ऑटोनॉमस संस्थेचा दर्जा प्राप्त असल्यामुळे कंपन्यांना अभिप्रेत असलेले अभियंते घडवुन त्यांना कमितकमी रू २० लाखांच वार्षिक पॅकेज मिळाले पाहीजे, या ध्येयाने सांजीवनी प्रवास करीत असल्याचे श्री कोल्हे यांनी शेवटी सांगीतले.
प्रास्तविक भाषणातुन डाॅ. ठाकुर यांनी संजीवनी शैक्षणिक संकुलातील विविध संस्थांची माहिती देवुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या संस्थांनी अनेक उच्चांक प्रस्थापित केल्याचे सांगीतले. वेगळ्या उंचीवर पोहचलेल्या माजी विध्यार्थ्याला आम्ही कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावतो, तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो, तुम्ही सुध्दा आपापल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करा आणि आम्हालाही तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणुन बोलाविण्याची संधी मिळाली पाहीजे, अशी अपेक्षा डाॅ. ठाकुर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. तिडके यांनी केले तर डाॅ. बी. एस. आगरकर यांनी आभार मानले.

फोटो ओळीः संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व एमबीएच्या वतीने २०२०-२१ मध्ये विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा श्री संजय धिवरे, श्री सुरेश कोल्हे, श्री अमित कोल्हे , श्री विजय नायडू व डॉ. ठाकूर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *