‘सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर..!!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२१ या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती स्पर्धा समिती प्रमुख सौ कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे.

सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा बाल रंगभूमी परिषद,
फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ, यशश्री बॅंगल्स अॅन्ड काॅस्मेटिक्स् अग्रवाल चहा,बोरा कलेक्शन,कापसे पैठणी, धन्वंतरी आयुर्वेदिक पंचकर्म यांचे सहकार्याने परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे ९ व्या वर्षी आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी पारंपारिक,निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक
विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते.सुमारे ३०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.

पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) निकिता गायकवाड, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)स्नेहा नेरकर,विद्या खर्डेकर,नेतल लाहोटी,मंजुषा दरोडे,पुष्पा खोसे, दिपाली जाधव,गिताश्री राठोड,आदिती नाईक, उज्वला सैंदाणे,साक्षी मतकर,गायत्री सोनजे,माधवी अलई यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)मोनिका भांडगे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)हर्षदा भगाडे,सविता वाणी,साक्षी भडकवाडे,सेजल पंजाबी,श्रेया मालकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

व्यक्तिचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) निखिल राजधरबाबा महानुभाव, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)गौरी फटांगरे,विभाश्री सोले,सौंदर्या बनसोड,भाविका केने,भाग्यश्री घोडके,रेणुका जाधव, प्रियांका नरोडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सामाजिक विषय रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आशिती वरखेडे,विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)प्रतिक्षा लोहकणे,प्रिती दुसाने, ऐश्वर्या सोनवणे,आदिती जंगम,कोमल ठोंबरे,रेणुका भालारे,आरती कोरडकर, वासंती गोंजारे,तनुष्का पारख यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

व्यंगचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र)स्नेहल आव्हाड,विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) साक्षी निकुंभ,धनश्री सोनवणे, कस्तुरी सोनवणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बक्षिस विजेत्यांचे सूर्यतेज सल्लागार समिती व सर्व सदस्यांनी
यांनी अभिनंदन केले आहे.
रांगोळी स्पर्धेच्या पाच प्रकारात प्रथम क्रमांक विजेते परिक्षण
समितीच्या शिफारसीनुसार पुढील वर्षापासून संयोजन समिती व परिक्षण सहाय्यक
सदस्य म्हणून कामकाज पहातील.आणि प्रदर्शनार्थ रांगोळी साकारतील.सर्व
बक्षिस विजेत्यांच्या सन्मानाची दिनांक,ठिकाण आणि वेळ हे आयोजकांकडून
विजेत्यांना पत्र/मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.असे सूर्यतेजचे कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.बक्षीस विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *